Anuradha Vipat
त्रिफळा चूर्ण हे केवळ पचनासाठीच नाही तर पोटावरची चरबी कमी करण्यासाठी देखील गुणकारी मानले जाते.
आयुर्वेदामध्ये त्रिफळा हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी प्रभावी मानले गेले आहे.
२-३ चमचे त्रिफळा चूर्ण आणि आवश्यकतेनुसार कोमट पाणी किंवा मध. त्रिफळा चूर्णमध्ये थोडे कोमट पाणी घालून त्याची जाडसर पेस्ट तयार करा.
हा लेप पोटावर जिथे चरबी जास्त आहे तिथे गोलाकार फिरवत लावा. सुमारे १५-२० मिनिटे हा लेप तसाच राहू द्या. लेप सुकल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाका.
त्रिफळा चूर्णामुळे स्थानिक स्तरावर रक्ताभिसरण सुधारते आणि चयापचय क्रिया वेगवान होण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास पचन सुधारून वजन कमी होण्यास मदत होते.
त्रिफळा चूर्ण त्वचेच्या छिद्रांवाटे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करू शकते.