Anuradha Vipat
रक्तातील पित्त वाढणे ही आरोग्यासाठी गंभीर समस्या ठरू शकते.
आयुर्वेदानुसार जेव्हा रक्तामध्ये उष्णता आणि आम्लता वाढते तेव्हा शरीर काही विशिष्ट संकेत देते.
त्वचेवर लाल रंगाचे चट्टे किंवा पुरळ येणे. त्वचेवर सतत खाज सुटणे किंवा अंगाची आग होणे.
सतत छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येणे . पोटात सतत उष्णता जाणवणे किंवा जळजळ होणे.
हात आणि पायांच्या तळव्यांची सतत आग होणे .अंगातून जास्त घाम येणे आणि घामाला दुर्गंधी येणे.
डोळे सतत लाल होणे किंवा डोळ्यांची आग होणे. प्रकाश सहन न होणे.
विनाकारण चिडचिड होणे आणि खूप राग येणे . मानसिक अस्वस्थता किंवा झोप न येणे.