Anuradha Vipat
हिवाळ्यात आरामदायी आणि स्टायलिश लूकसाठी ओवरसाईज स्वेटर हा सर्वात उत्तम पर्याय आहे.
सैल स्वेटरमुळे लूक बेढब दिसू नये म्हणून तुम्ही खालील ट्रेंडी पद्धतींनी तो स्टाईल करू शकता.
ओवरसाईज स्वेटर पूर्णपणे बाहेर सोडण्याऐवजी त्याचा पुढचा थोडासा भाग हाय-वेस्ट जीन्स किंवा ट्राउझरमध्ये 'टक-इन' करा आणि मागचा भाग सैल सोडा.
जर तुमचा ओवरसाईज स्वेटर खूप सैल किंवा लांब असेल, तर त्यावर कंबरेच्या भोवती एक स्टायलिश लेदर बेल्ट किंवा चेन बेल्ट बांधा. यामुळे स्वेटरला ड्रेससारखा आकार येतो.
अधिक फॉर्मल किंवा स्मार्ट-कॅज्युअल लूकसाठी आत पांढऱ्या किंवा निळ्या रंगाचा कॉलर शर्ट घाला आणि त्यावरून ओवरसाईज स्वेटर घाला.
अतिशय लांब ओवरसाईज स्वेटर मिनी स्कर्ट किंवा शॉर्ट्ससोबत 'स्वेटर ड्रेस'प्रमाणे स्टाईल करा. थंडीपासून बचाव करण्यासाठी आत फ्लीस-लाइन्ड स्टॉकिंग्ज घाला आणि पायात गुडघ्यापर्यंतचे लाँग बूट्स घाला.
फ्युजन आणि एलिगंट लूकसाठी जाड विणकामाचा ओवरसाईज स्वेटर सिल्क, सॅटिन किंवा प्लीटेड लाँग स्कर्टवर घाला.