Anuradha Vipat
प्रत्येक साडीवर उठून दिसतील आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच लुक देतील असे सध्याचे काही ट्रेंडी मंगळसूत्र डिझाइन्स.
सध्या एकाच वेळी दोन किंवा तीन पदरी मंगळसूत्र घालण्याचा ट्रेंड आहे. हे मंगळसूत्र पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या साड्यांवर उठून दिसतात.
ऑफिसवेअर किंवा रोजच्या वापरासाठी बारीक आणि कमी लांबीचे मंगळसूत्र खूप पसंत केले जात आहेत.
मध्यभागी मोठे गोल लटकन असलेले मंळसूत्र सध्या फॅशनमध्ये आहेत. हे डिझाइन कांजीवरम किंवा पैठणीसारख्या पारंपरिक साड्यांवर खूप छान दिसते.
जर तुम्हाला लग्नाच्या किंवा पार्टीवेअर साड्यांवर वेगळा लुक हवा असेल तर हिरे किंवा रंगीबेरंगी खडे असलेले मंगळसूत्र निवडा.
दोन वाट्या असलेले पारंपरिक मंगळसूत्र कधीही फॅशनमधून बाहेर जात नाही.
सोन्यासोबतच आता रोज गोल्ड फिनिश असलेल्या दागिन्यांनाही मागणी आहे.