Anuradha Vipat
लग्नसराईत पारंपरिक पण हटके लूक करण्यासाठी तुम्ही खालील काही स्टाईल्स ट्राय करू शकता.
पारंपारिक मराठमोळ्या लूकसाठी नऊवारी साडी सर्वोत्तम आहे. त्यावर तन्मणी, चिंचपेटी आणि नथ घातल्यास तुमचा लूक अतिशय राजेशाही दिसेल.
सहावारी पैठणीवर कोपरपर्यंत बाह्यांचे किंवा 'पफ स्लीव्हज' असलेले ब्लाउज शिवा.
गडद रंगाची कांजीवरम साडी आणि त्यावर 'टेम्पल ज्वेलरी' ट्राय करा. कंबरेला कमरपट्टा लावल्याने या लूकची शोभा अधिक वाढेल.
हेवी एम्ब्रॉयडरी असलेला शरारा सूट एक उत्तम पर्याय आहे. हा लूक पारंपरिक आणि ट्रेंडी दोन्ही वाटतो.
फ्लोअर लेन्थ अनारकली ड्रेससोबत हेवी चांदबाली आणि ओढणी घेतल्यास एक क्लासी लूक मिळतो.
लूकला साजेसे आणि पारंपारिक दागिने घातल्यास तुमचा लूक एकदम उठून दिसेल.