Raw Turmeric With Jaggery : कच्ची हळद आणि गूळ एकत्र खाल्ल्याने होतात 'हे' आजार दूर

Aslam Abdul Shanedivan

हिवाळ्यात आजारांचे संक्रम

हिवाळ्यात अनेक आजार डोके वर काढत असतात यात सर्दी खोकल्यासह कफ आणि इतर समस्या निर्माण होतात.

Winters | Agrowon

कच्ची हळद आणि गूळ

अशावेळी दुधासोबत कच्ची हळदीचे सेवन केल्यास आजार दूर होण्यास मदत होतेच. त्याचबरोबर कच्ची हळद आणि गूळ खाल्ल्यास आराम मिळतो

Raw Turmeric With Jaggery | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते

कच्ची हळद आणि गुळाच्या सेवनाने अनेक समस्या दूर होतात. हळदीतील अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबायोटिक गुणधर्म आणि गुळातील लोह रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरते

Increases immunity | Agrowon

सूज आणि वेदना

कच्ची हळद आणि गुळाचे सेवन केल्याने शरीरातील सूज आणि दुखण्याची समस्या कमी होऊ शकते. यासोबतच सांधेदुखीच्या समस्याही कमी होण्यास मदत मिळते.

Raw Turmeric With Jaggery | Agrowon

रक्त स्वच्छ होते

कच्ची हळद आणि गूळ खाल्ल्याने शरीरातील विषारीपणा दूर होऊन रक्त डिटॉक्स होते. ब्लॉकेजची समस्या देखील कमी होते.

Blood | Agrowon

पाचक प्रणाली सुधारणे

कच्ची हळद आणि गूळ खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होण्याबरोबरच गॅस्ट्रिकच्या समस्येपासूनही आराम मिळतो

Raw Turmeric With Jaggery | Agrowon

मासिक पाळीच्या समस्येत आराम

मासिक पाळीच्या दरम्यान वेदना आणि पेटके दूर करण्यासाठी कच्ची हळद आणि गूळाचे सेवन लाभकारक ठरते. यामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होते.

period | Agrowon

असे करा सेवन

कच्ची हळद किसून तुपात तळून घ्या. यानंतर हळदीचा रंग गडद झाल्यावर त्यात गूळ घालून चांगले शिजवून घ्या. यानंतर ते साठवून ठेवा आणि झोपण्यापूर्वी दुधासोबत खा.

Raw Turmeric With Jaggery | Agrowon

Hing Water Drink : 'या' मसाल्याचे पाणी प्या अन् पोटाच्या सर्व समस्या दूर करा

आणखी पाहा