kurdai Making : वाळवणाच्या कामात महिला दंग

Mahesh Gaikwad

उन्हाळी वाळवण

सध्या ग्रामीण भागात महिलांची उन्हाळी वाळवणाच्या कामांची लगबग सुरू झाली आहे.

kurdai Making | Agrowon

उन्हाळी पदार्थ

वर्षभर लागणारे उन्हाळी पदार्थ करण्यात महिला दंग असल्याचे सकाळच्यावेळी चित्र पाहायला मिळत आहे.

kurdai Making | Agrowon

कुरडया, पापड

शेवया, कुरडया, पापड, सांडगे, वेफर्स, उपवासाचे साबुदाणा पापड असे पदार्थ तयार करण्याची महिलांची लगबग दिसत आहे.

kurdai Making | Agrowon

मराठी खाद्य संस्कृती

उन्हाळी वाळवण म्हणजे मराठमोळ्या खाद्य संस्कृतीची खास ओळख आहे. विशिष्ट चव असलेल्या वाळवणांच्या पदार्थांना शहरांमध्ये मोठी मागणी असते.

kurdai Making | Agrowon

तळणाचे पदार्थ

उन्हाळी वाळवणाचे पदार्थ वर्षभर साठवून ठेवता येतात. ग्रामीण भागात सणासुदीला तळणाचे हे पदार्थ ताटामध्ये हमखास बघायला मिळतात.

kurdai Making | Agrowon

ग्रामीण परंपरा

उन्हाळी वाळवणाचे पदार्थ तयार करण्याची परंपरा अजूनही ग्रामीण भागात महिला जपत आहेत. एकमेकींच्या मदतीने अंगणात सकाळी-सकाळी ही कामे या दिवसांत हमखास पाहयला मिळतात.

kurdai Making | Agrowon

पदार्थांना मागणी

आजकाल शहरांमध्ये उन्हाळी वाळवण करताना क्वचितच महिला दिसतात. त्यामुळे गावाकडून येणाऱ्या वाळवणाच्या पदार्थांची मोठी मागणी असते.

kurdai Making | Agrowon