Mahesh Gaikwad
शेतीला पूरक धंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे खेळते भांडवल उपलब्ध होते.
दुग्ध व्यवसाय करताना अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यात देशी गायींच्या तुलनेत संकरित गायी जास्त प्रमाणात दिसतात.
देशी गायीच्या तुलनेत संकरित गायींचे दूध उत्पादन जास्त असते. त्यामुळे अनेक पशुपालकांच्या गोठ्यात संकरित गायी पाहायला मिळतात.
त्यामुळे पशुपालक संकरित गायींच्या संगोपनाला प्राधान्य देताना दिसतात. मात्र, अशा काही देशी गायी देशी गायींच्या जाती आहेत, ज्या जास्त दूध देतात.
दूध उत्पादनासाठी गीर गाय ही एक चांगला पर्याय आहे. या गायीचे मूळस्थान गुजरातमधील आहे.
साहिवाल या गायीचे मूळस्थान पंजाब आणि राजस्थानमध्ये आढळते ही गाय दिवसाला १३ लिटरपर्यंत दूध देते.
दूध उत्पादनासाठी पशुपालक थारपारकर गायीचे संगोपन करतात. ही गाय दिवसाला ८-९ लिटरपर्यंत दूध देते.
लाल सिंधी गाय सुध्दा दूध उत्पादनाला चांगली असते. अनेक पशुपालक या गायीचे संगोपन करतात.