Coconut Vadi Recipe : नारळी पौर्णिमा विशेष: तोंडात टाकताच विरघळेल अशी मऊ आणि पांढरीशुभ्र नारळाची वडी!

Anuradha Vipat

ओल्या नारळाची वडी

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर गोडधोड बनवण्यासाठी ओल्या नारळाची वडी हा एक उत्तम आणि झटपट होणारा पारंपारिक पदार्थ आहे.

Coconut Vadi Recipe | agrowon

परिपूर्ण रेसिपी

कमी साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी रसरशीत वडी कशी बनवावी, याची परिपूर्ण रेसिपी खाली दिली आहे.

Coconut Vadi Recipe | agrowon

साहित्य

ओल्या नारळाचा खवून घेतलेला कीस,साखर,साययुक्त दूध किंवा दूध पावडर,साजूक तूप,वेलची आणि जायफळ पूड,बदामाचे काप.

Coconut Vadi Recipe | agrowon

कृती

साजूक तूप गरम करा. त्यात ओल्या नारळाचा कीस घालून मंद आचेवर २ मिनिटे परतून घ्या आता त्यात दूध आणि साखर घाला. साखरेला पाणी सुटेल आणि मिश्रण पातळ होईल.

Coconut Vadi Recipe | agrowon

घट्ट होईपर्यंत परता

हे मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत राहा. मिश्रण कढई सोडू लागेपर्यंत आणि गोळा होईपर्यंत (सुमारे ७-८ मिनिटे) परता.

Coconut Vadi Recipe | agrowon

स्वाद वाढवा

मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची-जायफळ पूड आणि दूध पावडर घालून चांगले मिक्स करा आणि गॅस बंद करा.

Coconut Vadi Recipe | agrowon

वड्या पाडा

एका प्लेटला तूप लावून घ्या. त्यावर हे गरम मिश्रण काढून चमच्याने सारखे पसरवा. वरून बदामाचे काप दाबा. मिश्रण कोमट असतानाच चाकूने वड्यांच्या आकारात कापून घ्या आणि थंड झाल्यावर डब्यात भरा.

Coconut Vadi Recipe | agrowon

Watermelon Seeds Benefits : कलिंगडाच्या बिया फेकण्याची चूक करू नका! हे आश्चर्यकारक फायदे वाचून थक्क व्हाल.

Watermelon Seeds Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...