Anuradha Vipat
सनातन परंपरेत घराचे मुख्य प्रवेशद्वार हे लक्ष्मीच्या आगमनाचे स्थान मानले जाते.
या दिवाळीत आणि दैनंदिन जीवनात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मुख्य दारासमोर रांगोळी कशी काढावी याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
दारासमोर मोठे कमळाचे फूल काढून त्याच्या मध्यभागी किंवा उंबरठ्यावरून आत येणारी लक्ष्मीची छोटी लाल पावले काढावीत.
रांगोळीच्या केंद्रस्थानी पाण्याने आणि नारळाने भरलेला कलश काढावा आणि त्याच्या दोन्ही बाजूंना शुभ 'स्वस्तिक' काढावे.
ठिपके जोडून काढली जाणारी ही सर्वात जुनी आणि सात्त्विक पद्धत आहे. ५x५ किंवा ७x७ ठिपके टाकून त्यात विविध भौमितिक आकार आणि त्रिकोण गुंफले जातात.
हाताच्या पाचही बोटांचा वापर करून आणि पांढऱ्या रांगोळीच्या साहाय्याने विविध सुंदर नक्षी काढल्या जातात.
यामध्ये रंगांऐवजी पिवळ्या-नारंगी झेंडूच्या पाकळ्या, गुलाबाच्या पाकळ्या आणि हिरव्या पानांचा वापर केला जातो. रांगोळीच्या मध्यभागी आणि कोपऱ्यांवर मातीचे प्रज्वलित दिवे ठेवले जातात.