Anuradha Vipat
दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा सण आहे. हा सण मनातील कोपरेही उजळून टाकण्याची उत्तम संधी देतो.
वर्षाभरात किंवा भूतकाळात नातेसंबंधांमध्ये आलेली कटुता, गैरसमज आणि अबोला दूर करून पुन्हा एकत्र येण्यासाठी दिवाळी हा सर्वोत्तम काळ मानला जातो.
"मी आधी कशाला फोन करू?" किंवा "त्यांचीच चूक होती" हा विचार बाजूला ठेवा. नात्यामध्ये चूक कोणाची होती यापेक्षा नाते टिकवणे जास्त महत्त्वाचे आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने एक साधा फोन करा किंवा मेसेज पाठवा.
दिवाळीचा फराळ किंवा मिठाई हा नाते जोडण्याचा उत्तम मार्ग आहे.
जर व्यक्ती दूर राहत असेल, तर एक छानसे गिफ्ट किंवा मिठाईचा बॉक्स त्यांच्या घरी कुरिअर करा.
दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे सण नातेसंबंधांमधील प्रेम वाढवण्यासाठीच असतात. या दिवशी एकत्र जेवणाचे किंवा गेट-टुगेदरचे आयोजन करा.