Anuradha Vipat
सध्या सगळीकडे नवरात्र आणि नवरात्रीत खेळल्या जाणाऱ्या गरब्याची चर्चा आहे. गरबा हा आताच्या यंग जनरेशची सगळ्यात मोठी क्रेझ आहे.
गरबा म्हणलं की सगळ्यात आधी येतो तो म्हणजे गरब्यासाठी लूक कसा करायचा हा प्रश्न. आज आपण लहान मुलींसाठी गरबा लूक कसा करायचा ते पाहूयात.
लहान मुलींच्या गरबा लूकसाठी त्यांना सूट होतील अश्या पारंपरिक आणि आकर्षक दिसणाऱ्या कपड्यांची निवड करा
लहान मुलींच्या गरबा लूकसाठी ऑक्सडाईज्ड दागिने निवडा, जसे की गळ्यातले, कानातले, बिंदी आणि हातात वाजणारे कडे.
लहान मुलींना घेरदार स्कर्ट, डिझायनर चोळी यांसारखे कपडे अगदी शोभून दिसतात.
तुम्ही लहान मुलींच्या डोळ्यांना हलके ग्लिटरी किंवा चमकदार आयशॅडो लावून त्यांचा लूक अजून छान बनवू शकता
लहान मुलींच्या डोक्यावर आरसे असणारा बेल्ट लावा आणि हातात दांडिया देवून त्यांचे छान असे फोटो देखील काढू शकता.