Anuradha Vipat
ग्लोईंंग स्किनसाठी बाजारत अनेक केमिकलयुक्त असे महागड्या स्किन केअर क्रिम उपलब्ध आहेत.ग्लोईंंग स्किनसाठी तरुण पिढी अनेक नवनवीन उपाय करत असते
चला तर मग आजच्या या लेखात आपण ग्लोईंंग स्किनसाठी एवॉकोडा फळापासून केमिकलफ्री बनलेला घरगुती मास्क कसा उपयुक्त आहे हे पाहूयात.
ग्लोईंंग त्वचेसाठी एवोकॅडो मास्क उत्तम घरगुती उपाय आहे. एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई आणि सी असते.
एवोकॅडो मास्क त्वचेला मॉइश्चराइझ करते आणि सतत हायड्रेट ठेवते
एवोकॅडो मास्क त्वचेचा निस्तेजपणा कमी करते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते
एवोकॅडो मास्क तयार करण्यासाठी अर्धा पिकलेला एवोकॅडो मॅश करून त्यात मध किंवा दही मिसळा.
तयार झालेले मास्कचे मिश्रण चेहऱ्यावर लावून १०-१५ मिनिटांनी धुवा