Swarali Pawar
उन्हाळ्यात ट्रॅक्टरवर जास्त ताण येतो. त्यामुळे वेळेवर देखभाल खूप महत्त्वाची आहे.
धूळ आणि कचरा साचल्याने ट्रॅक्टर गरम होतो. म्हणून रेडिएटर नियमित स्वच्छ करा.
कूलंटची पातळी कमी झाली तर इंजिन गरम होते. वेळोवेळी कूलंट भरून घ्या.
दुपारच्या उन्हात ट्रॅक्टर चालवणे टाळा. सकाळी किंवा संध्याकाळी काम करा.
ऑइल वेळेवर बदलल्याने इंजिन सुरक्षित राहते. एअर फिल्टर स्वच्छ ठेवल्यास काम चांगले होते.
उष्णतेमुळे बॅटरी कमजोर होते. टर्मिनल स्वच्छ ठेवा आणि पाणी तपासा.
जास्त गरमीत टायर फुटण्याचा धोका असतो. योग्य हवा ठेवल्यास ट्रॅक्टर सुरक्षित राहतो.
ट्रॅक्टर थेट उन्हात उभा ठेवू नका. सावलीत ठेवल्यास आयुष्य वाढते.