Anuradha Vipat
बऱ्याचदा लोक एकमेकांचा टॉवेल वापरतात. कपल तर हमखास एकमेकांचा टॉवेल वापरतातचं. पण असं एकमेकांचा टॉवेल वापरणं आरोग्यासाठी धोकादायक आहे.
एका संशोधनानुसार एका वापरलेल्या टॉवेलमध्ये लाखो धोकादायक बॅक्टेरिया असू शकतात
एकमेकांचा टॉवेल वापरल्याने त्वचेला नुकसान होऊ शकतं
एकमेकांचा टॉवेल सतत वापरल्याने अंगावर मुरुम येऊ शकतात किंवा एक्झिमासारखे आजार होऊ शकतात.
ओल्या टॉवेलमुळे संसर्ग आणि रोग पसरण्याचा धोका असतो.
एकमेकांचा टॉवेल सतत वापरल्याने टॉवेलमधील घामामुळे आणि बॅक्टेरियाच्या वाढीमुळे दुर्गंधी पसरू शकते.
कोणाचाही टॉवेल वापरणे टाळावे कारण तो तुमच्यासाठा नक्कीच धोकादायक असू शकतो