Buddha Caves Ellora : वेरुळमध्ये बुद्ध लेण्यांवर किरणोत्सव पर्यटकांनी 'याचि डोळा' अनुभवला

sandeep Shirguppe

वेरूळ लेणी

जगप्रसिद्ध वेरूळ येथील दहा क्रमांकाच्या लेणीतील बुद्ध मूर्तीवर रविवारी किरणोत्सव झाला.

Buddha Caves Ellora | agrowon

विहंगम दृश्य

तब्बल तासभर हे विहंगम दृश्य 'याचि डोळा' पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली.

Buddha Caves Ellora | agrowon

सूर्य किरणे

सूर्याची मावळतीची किरणे खोल गाभाऱ्यात असलेल्या गौतम बुद्ध यांच्या मुखावर पडताच बुद्धांची विलक्षण शांत भावमुद्रा सूर्याच्या तेजाने उजळली होती.

Buddha Caves Ellora | agrowon

वर्षातून एकदाच प्रसंग

वर्षातून एकदाच होणारा हा प्रसंग पाहण्यासाठी पुणे, मुंबईहून पर्यटक आले होते.

Buddha Caves Ellora | agrowon

बुद्ध धम्मचक्र

दहा क्रमांकाच्या लेणीत प्रवेश केल्याबरोबर भगवान बुद्ध धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात.

Buddha Caves Ellora | agrowon

बोधिसत्व

बुद्धाच्या उजव्या हाताला बोधिसत्त्व पद्मपाणी व डाव्या हातास बोधिसत्त्व वज्रपाणी पहावयास मिळते.

Buddha Caves Ellora | agrowon

उत्तरायणात सूर्यकिरणे

बुद्ध लेणीवर उत्तरायणात सूर्यकिरणे येतात वर्षातून १०, ११ व १२ मार्चला किरणोत्सव होऊन बुद्ध प्रतिमा उजळून निघते.

Buddha Caves Ellora | agrowon

१० मार्चचा किरणोत्सव

१० मार्चचा किरणोत्सव जास्त वेळ असतो. दहा क्रमांकाच्या बुद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणात जात असताना सूर्यकिरणे येतात.

Buddha Caves Ellora | agrowon

तेजोमय दृश्य

तेजोमय दृश्य टिपत उपस्थित पर्यटक गौतम बुद्धांची शांत भावमुद्रा पाहण्यात तल्लीन होते. तब्बल एक तास हा किरणोत्सव सुरू होता.

Buddha Caves Ellora | agrowon

मूर्ती व शिल्प संशोधन संस्था

इतिहास अभ्यासकच नाही तर खगोल अभ्यासकांना आपुलकीचा वाटावा, असा हा विषय मूर्ती व शिल्प संशोधन संस्थेच्या मार्फत प्रकाशात आला.

Buddha Caves Ellora | agrowon