Anuradha Vipat
उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
शरीरातील सोडियमचेप्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पोटॅशियम महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीज अतिशय कमी असतात. यात पोटॅशियम आणि विद्राव्य फायबर भरपूर असते.
नियमित टोमॅटो खाल्ल्याने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही प्रकारचा रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
कारले केवळ शुगर साठीच नाही, तर बीपी नियंत्रित ठेवण्यासाठीही फायदेशीर आहे.
लाल भोपळा आणि त्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अर्जिनाइन नावाचे अमिनो ॲसिड असते.
काकडी नैसर्गिक मूत्रवर्धक म्हणून काम करते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त सोडियम लघवीवाटे बाहेर पडते आणि बीपी कमी होतो.