Mahesh Gaikwad
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. उष्णतेपासून शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित आहार घेणे गरजेचे असते.
चला तर मग जाणून घेवूयात उन्हाळ्यात आहारामध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश असावा. ज्यामुळे शरीराचे तापमान थंड राहू शकते.
उन्हाळ्याच्या दिवसात आहारामध्ये दुधी भोपळ्याचा समावेश करावा.
या दिवसात आहारामध्ये फरसबी (श्रावण घेवडा) ही भाजी आहारत असायलाच हवी. ही भाजी आरोग्यासाठी उपयुक्त असते.
काकडीमध्ये भरपूर पाणी असते. ती शरीर थंड ठेवते, त्वचेचं आरोग्य राखते आणि पचनासाठी उपयुक्त ठरते.
पालकामध्ये लोह, कॅल्शियम आणि फायबर्स असतात. ही भाजी शरीर थंड ठेवण्यासाठी आणि शरीरातील पोषकतत्त्वे टिकवण्यासाठी उपयुक्त आहे.
उन्हाळ्यात मिरची जरी उष्ण वाटत असली, तरी ती शरीरातील घाम वाढवते आणि त्यामुळे शरीराचे तापमान कमी करण्यास मदत होते.
उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंड ठेवण्यासाठी कारल्याची भाजी खावी. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.