Mahesh Gaikwad
उन्हाळ्याच्या दिवसांत केसांची स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. अन्यथा घामामुळे केसांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. परिणामी या दिवसांत केसांची विशेष निगा राखावी लागते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णतेमुळे डोक्याला घाम येतो. त्यामुळे केसही घामेजतात. केसांच्या मुळांमध्ये घामाच्या ग्रंथी ज्यामुळे घाम येतो.
जर तुमच्या केसांमध्ये जास्त प्रमाणात घाम येत असेत, तर काही उपोययोजना करून ही समस्या नियंत्रित करू शकता.
केस धुण्यापूर्वी पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळा. लिंबू घातलेल्या पाण्याने केस धुवा. यामुळे डोक्यातील कोंडा साफ होतो आणि घामही येत नाही.
सफरचंदाचे व्हिनेगर केसांना लावणे फायदेशीर असते. यामुळे धुण्यापूर्वी केसांमध्ये मऊपणा येते आणि घामही येत नाही. सफरचंदाचे व्हिनेगर पाण्यामध्ये मिसळा. केस शॅम्पू केल्यानंतर आता या पाण्याने केसांना धुवा.
केसांमध्ये वारंवार घाम येण्याची समस्येसाठी आठवड्यातून २-३ वेळा केस शॅम्पूने धुवायला हवे. केस जितके स्वच्छ राहतील, तितकाच कमी घाम येईल.
शरीराल कमी घाम येण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीर हायड्रेट राहिल्यान घामाची कमी निर्मिती होते, ज्यामुळे केसांमध्ये घाम येण्याची समस्या कमी होऊ शकते.
जर तुम्हाला केसांमध्ये जास्त घाम येण्याची समस्या असेल, तर केसांना तेलाने मसाज करा. यामुळे केस कोरडे राहणार नाहीत.
यासाठी तुम्ही नारळाचे, मोहरीचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईलही वापरू शकता. यामुळे केसांची चांगली वाढही होते. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.