Migraine Trigger Foods : 'हे' पदार्थ खाल्ल्याने तुमची डोकेदुखी आणि मायग्रेन वाढू शकते!

Anuradha Vipat

खालील पदार्थ

दैनंदिन आहारातील खालील पदार्थ डोकेदुखीचे मुख्य 'ट्रिगर' ठरू शकतात

Migraine Trigger Foods | Agrowon

कॅफिनयुक्त पेये

चहा किंवा कॉफीचे अतिसेवन केल्याने किंवा रोजच्या सवयीपेक्षा अचानक कमी-जास्त घेतल्याने मेंदूतील रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि तीव्र डोकेदुखी सुरू होते.

Migraine Trigger Foods | Agrowon

जुने किंवा प्रोसेस्ड चीज

फेटा , ब्लू चीज, पार्मेजान आणि चेडार यांसारख्या जुन्या चीजमध्ये 'टायरामाईन' नावाचे रसायन असते. हे रसायन मेंदूतील नसांना उत्तेजित करून मायग्रेनचा झटका आणण्यास कारणीभूत ठरते.

Migraine Trigger Foods | agrowon

चॉकलेट

चॉकलेटमध्ये कॅफिन आणि 'बीटा-फेनिलेथिलामाइन' हे घटक असतात. संवेदनशील व्यक्तींमध्ये चॉकलेट खाल्ल्यानंतर काही तासांतच डोके दुखू शकते.

Migraine Trigger Foods | Agrowon

चायनीज आणि पॅकेटबंद पदार्थ

चायनीज फूड, सोया सॉस, पॅकेटमधील सूप आणि चिप्समध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट व सोडियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तदाब वाढून डोके जड होणे किंवा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

Migraine Trigger Foods | Agrowon

प्रोसेस्ड मांस

सॉसेज, सलामी, बेकन किंवा हॉट डॉग यांसारखे टिकवून ठेवलेले मांसाहारी पदार्थ ताजे ठेवण्यासाठी त्यात नायट्रेट्स आणि नायट्राईट्स वापरतात. हे घटक रक्तवाहिन्या प्रसरण पावण्यास कारणीभूत ठरतात आणि डोकेदुखी वाढवतात.

Migraine Trigger Foods | Agrowon

आंबवलेले आणि लोणच्याचे पदार्थ

जुने लोणचे, व्हिनेगरयुक्त पदार्थ आणि आंबवलेल्या पदार्थांमध्ये टायरामाईन व हिस्टामाईनचे प्रमाण जास्त असल्याने डोकेदुखी वाढू शकते.

Migraine Trigger Foods | agrowon

Garlic And Ginger : हृदयाचे आरोग्य सुधारणारे घरगुती उपाय: लसूण आणि आल्याचे फायदे

Garlic And Ginger | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...