Team Agrowon
खरीप हंगामात टोमॅटो लागवड ही मे ते जून या कालावधीत रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून जून ते जुलै महिन्यात पुनर्लागवड केली जाते.
टोमॅटोमध्ये सरळ व संकरित प्रकारात विविध वाण उपलब्ध आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने स्थानिक, मध्यम ते लांबच्या पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी विविध वाण प्रसारित केलेले आहेत.
टोमॅटोचा धनश्री वाण मध्यम वाढणारा जवळच्या ते मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी उपयुक्त आहो. या वाणापासून हेक्टरी ४५ ते ५० टन उत्पादन मिळते.
हा वाण मर्यादित वाढणारा आणि जवळच्या ते मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी योग्य आहे. हेक्टरी ४० ते ४५ टन उत्पादन मिळते. १६५ दिवसात उत्पादन मिळायला सुरुवात होते. हा वाण फळे पोखरणारी अळी व विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम आहे.
हा वाण सतत वाढणारा असून लांबच्या बाजारपेठेसाठी योग्य आहे. हेक्टरी ५५ ते ६० टन उत्पादन मिळते. १८० दिवसात उत्पादन मिळायला सुरुवात होते. हा वाण फळे पोखरणारी अळी व विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम आहे.
हा वाण मर्यादित वाढणारा, फळांचा रंग केसरी असून उत्पादन हेक्टरी ५५ ते ५७ टन मिळते.हा वाण विषाणूजन्य रोगांना मध्यम प्रतिकारक्षम आहे.
फुले जयश्री अमर्यादित वाढणारा असून उत्पादन हेक्टरी ५० ते ५५ टन मिळते. फळाचे सरासरी वजन ६.३० ग्रॅम मिळते. हा वाण विषाणूजन्य रोगांना मध्यम प्रतिकारक्षम आहे.
साधारणपणे सरळ वाणांसाठी ४०० ग्रॅम व संकरित वाणांसाठी १२५ ग्रॅम बियाणे प्रति हेक्टरसाठी बियाणे पुरेसे होते. १ हेक्टर क्षेत्रावर लागवडीसाठी ३ गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी असते.
Lightning : विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट का होतो?