Team Agrowon
वीज ही आकाशात निर्माण होणारी विद्युत चमक आहे, जी वादळाच्या वेळी ढगांच्या घर्षणामुळे निर्माण होते.
वीज कोसळण्याच्या वेळेस, वातावरणातील वायूंचे आयनायझेशन होऊन विद्युत प्रवाह निर्माण होतो, जो जमिनीपर्यंत पोहोचतो. यामुळे प्रचंड उष्णता, प्रकाश आणि आवाज निर्माण होतो.
वीजनिर्मिती विशेषतः क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये होते. हे ढग वीजनिर्मितीसाठी अत्यंत अनुकूल असतात. क्युम्युलोनिंबस ढग काळे, जड आणि अधिक घनतेचे असतात, ज्यांचा विस्तार पर्वताप्रमाणे उंच असतो. त्यांच्यावरील भागाचा आकार ऐरणीसारखा असतो तर खालील पृष्ठभाग सपाट असतो.
हे ढग बहुतांश वेळा मुसळधार पाऊस, गडगडाट, वीज आणि गारायुक्त वळवाचा पाऊस यांच्याशी संबंधित असतात. तसेच वावटळ आणि वादळ निर्माण करण्याचे प्रमुख कारण ठरतात.
क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये पाण्याच्या थेंबांसोबत बर्फाचे कण देखील असतात. या विविध घटकांमुळे विद्युत आवेश निर्मिती होते आणि विजेचा प्रचंड प्रकाश आणि आवाज निर्माण होतो.
महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि वादळी वातावरणासाठी क्युम्युलोनिंबस ढग कारणीभूत ठरतात. त्यामुळे वीज कोसळण्याच्या काळात सुरक्षितता उपाययोजना अवलंबणे अत्यावश्यक असते.
वीजनिर्मिती होण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. ढगांची निर्मिती होताना जमिनीवरून वर जाणारे उष्ण वारे थंड होऊ लागतात. यामुळे ढगांमध्ये पाण्याचे कण थंड होऊन कालांतराने ते हिमकणांमध्ये परिवर्तित होतात.
उष्ण हवा वर जात राहते आणि थंड हवा खाली येते. या सततच्या प्रक्रियेमुळे ढगांमधील हिमकण एकमेकांवर घासतात, ज्यामुळे त्यांच्यावर धन (सकारात्मक) आणि ऋण (नकारात्मक) प्रभार तयार होतात.
Soil Ploughing : चांगल्या फायद्यासाठी नांगरणी केंव्हा कराल?