Team Agrowon
अक्रोडची रचना व मानवी मेंदूची रचना यात बराच सारखेपणा आहे. अक्रोडच्या टरफलात मेंदूच्या स्वास्थ्याकरिता अावश्यक अशा मगज बनविला आहे.
ज्यांना बौद्धिक थकवा आहे, मेंदूचे काम जास्त आहे त्यांनी अक्रोड नियमितपणे दोन-तीन खावे.
ज्यांना झोप येत नाही त्यांनी डोक्याला अक्रोडच्या तेलाचा मसाज झोपताना करावा. उत्तम झोप लागते.
अक्रोडचे बरेचसे गुण बदामासारखे आहेत. अक्रोड कफपित्तवर्धक, वीर्यवर्धक, बल्य आहे.
अक्रोड जास्त प्रमाणात घेतले तर शरीराचा दाह होतो.
वजन वाढविण्याकरिता अक्रोड उपयुक्त अाहे. धातू क्षयामुळे उद्भवलेल्या वातविकारात, आमवातात अक्रोड पथ्यकर आहे. प्रोटिन व स्निग्ध पदार्थ जास्त आहेत.
एरंडेलाच्या गुणाशी साम्य
अक्रोडच्या तेलाचे एरंडेलाच्या गुणाशी साम्य आहे.
Mango Ripening : रंग, चव एकसारखी येण्यासाठी आंबे पिकविण्याची घरगुती पद्धत