Team Agrowon
योग्य पक्वतेला काढणी केलेल्या आंब्याच्या नैसर्गिकरीत्या पिकवणीवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गवत, तणस याऐवजी वर्तमानपत्राचाही वापर करता येईल.
जमिनीवर रचून आंबा फळे पिकविण्याची पद्धत सामान्यतः वापरली जात असली, तरी त्या ऐवजी प्लॅस्टिक क्रेटचाही वापर करता येतो. क्रेटमध्येही खालून आणि बाजूने पेपरचे थर ठेवून फळे ठेवावीत.
खरेतर आंबा पिकविण्यासाठी २० ते २३ अंश सेल्सिअस तापमान आणि ९० ते ९५ टक्के सापेक्ष आर्द्रता ही अत्यंत महत्त्वाची असते.
आंबा पिकविण्याच्या खोलीतील वातावरण शक्यतो थंड असावे. पत्र्याच्या शेडऐवजी गवताने शाकारलेली किंवा कौलाचे छत असलेल्या अंधाऱ्या खोलीमध्ये आंबे पिकविण्यासाठी ठेवावेत.
अंधाऱ्या खोलीमध्ये आर्द्रता वाढविण्यासाठी रिकामी पोती ओली करून खोलीतच पण आंब्यापासून दूर ठेवावीत. एसी रूम असल्यास त्यात आंबे पिकविण्यासाठी ठेवणे शक्य आहे.
इथेफॉन दीड मिलि अधिक बेनोमिल* एक ग्रॅम प्रति लिटर पाणी असे द्रावण तयार करून त्यात फळे पाच मिनिटे बुडवावीत. त्यानंतर व्यवस्थित कोरडी करून घ्यावीत. या पद्धतीने ही फळे पिकविण्यास ठेवावीत.
इथेफॉन दीड मिलि अधिक बेनोमिल मुळे फळे देठाकडून सडणे, करपा रोगामुळे फळे सडणे असे प्रकार होत नाहीत. या द्रावणात इथेफॉनचा समावेश असल्यामुळे फळे एक ते दोन दिवस लवकर पिकतात. फळांना आकर्षक रंगही येतो.
Jackfruit Benefits : काटेरी फणस आरोग्यासाठी आहे गोड