Dehydration Remedies : थकवा आणि डिहायड्रेशन होईल दूर! शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी खा 'या' गोष्टी

Anuradha Vipat

इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण

शरीर हायड्रेट ठेवणे म्हणजे केवळ भरपूर पाणी पिणे नव्हे, तर शरीरातील पाण्याचे आणि इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण संतुलित राखणे होय.

Dehydration Remedies | Agrowon

पाण्याचे प्रमाण

शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असल्यास पचनक्रिया सुधारते, त्वचा चमकदार होते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

Dehydration Remedies | Agrowon

नारळ पाणी

नारळ पाणी हे आरोग्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक 'इलेक्ट्रोलाइट' आहे. यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते.

Dehydration Remedies | agrowon

काकडी

काकडीमध्ये तब्बल ९५% पेक्षा जास्त पाणी असते. उन्हाळ्यात किंवा रोजच्या आहारात सॅलड म्हणून काकडी खाल्ल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते .

Dehydration Remedies | Agrowon

टरबूज आणि खरबूज

या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C मुळे त्वचेला थंडावा मिळतो.

Dehydration Remedies | agrowon

घरगुती ताक

जेवणानंतर एक ग्लास ताक पिणे शरीराला हायड्रेट ठेवण्याचा सोपा पारंपरिक उपाय आहे. ताकातील प्रोबायोटिक्स पचनक्रिया देखील मजबूत करतात.

Dehydration Remedies | Agrowon

लिंबू पाणी किंवा ओआरएस

हलका थकवा किंवा चक्कर आल्यासारखे वाटल्यास पाण्यात लिंबू, थोडे मीठ आणि साखर घालून पिण्याने शरीरातील सोडियमची पातळी त्वरित संतुलित होते.

Dehydration Remedies | Agrowon

Drumstick Amti Recipe : आरोग्यासाठी अमृत! बनवा खमंग आणि औषधी शेवग्याच्या शेंगांची आमटी

Drumstick Amti Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...