Anuradha Vipat
झिंक हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे.
हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी, पेशींच्या विकासासाठी आणि जखमा भरून काढण्यासाठी आवश्यक असते.
शरीरात झिंकची कमतरता झाल्यास शरीर अनेक प्रकारचे धोक्याचे संकेत देऊ लागते.
शरीरात झिंक कमी झाल्यास प्रतिकारशक्ती कमजोर होते आणि व्यक्ती वारंवार सर्दी, खोकला, ताप किंवा इतर जंतूसंसर्गाला बळी पडते.
शरीरावर झालेली जखम, खरचटणे किंवा जखमेचे व्रण भरून येण्यासाठी खूप जास्त वेळ लागत असेल, तर हे झिंक कमी असल्याचे स्पष्ट लक्षण आहे.
अचानक आणि मोठ्या प्रमाणावर केस गळणे किंवा डोक्यावरील त्वचा कोरडी पडून कोंडा होणे.
झिंक कमी झाल्यास अन्नाची चव लागत नाही, भूक मंदावते आणि वास ओळखण्याची क्षमता कमी होते.