Anuradha Vipat
स्नेक प्लांट हे केवळ घराची शोभा वाढवणारे शोभेचे झाड नाही, तर ते एक अत्यंत शक्तिशाली नॅचरल एअर प्युरिफायर आहे.
कमी देखभालीत वाढणारे हे झाड आरोग्यासाठी अनेक दृष्टीने वरदान मानले जाते .
स्नेक प्लांटरात्रीच्या वेळीही कार्बन डायऑक्साइड शोषून घेते आणि मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन तयार करते. म्हणूनच हे झाड बेडरूममध्ये ठेवण्यासाठी परफेक्ट मानले जाते.
स्नेक प्लांट हवेतील बेंझिन, फॉर्मल्डिहाइड, ट्रायक्लोरोइथिलिन, जायलिन आणि टॉल्विन यांसारखे आरोग्यासाठी घातक असणारे विषारी वायू शोषून घेते.
हवा शुद्ध करून हे झाड हवेतील धूळ, परागकण आणि इतर ॲलर्जन्सचे प्रमाण कमी करते. ज्या लोकांना श्वसनाचा त्रास, अस्थमा किंवा ॲलर्जी आहे, त्यांना मोकळा श्वास घेण्यास मदत होते.
स्नेक प्लांट घरातील वातावरण प्रसन्न ठेवते, ज्यामुळे दिवसभराचा थकवा आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.
या झाडाला खूप कमी सूर्यप्रकाश आणि कमी पाण्याची गरज असते. आठवड्यातून एकदा किंवा माती कोरडी झाल्यावर पाणी दिले तरी हे झाड सहज जगते .