Team Agrowon
वाढती मजुरी, मजुरांची कमतरता तसेच वेळेआभावी शेतकरी जमीन ट्रॅक्टरने नांगरण्याला प्राधान्य देतात.
ट्रॅक्टरने जमीन नांगरताना पुढच्या आणि मागच्या चाकातील अंतर समान असावे.
वापरात असलेली साधने जसे फाळ, हा जमिनीशी ९० अंशांत काम करणारा असावा.
पाळ्या घालताना वापरात असलेली पट्टी समान खोलीवरील मातीत चालली पाहिजे.
सर्व जागी असलेले नट व बोल्ट घट्ट असावेत.
ट्रॅक्टर हळू चालवूनच चांगली नांगरट शक्य आहे. काम संपण्याची घाई म्हणून जोरात चालवू नये.
नांगरटीत पूर्व पिकांचे सर्व शिल्लक अवशेष पूर्ण गाडले जाणे जरुरीचे आहे.
Summer Drinks : उन्हाळ्यात शरिराला थंडावा देण्यासाठी विविध सरबतांचे प्रकार ; ट्राय तर करुन बघा