Team Agrowon
कच्च्या आंब्यापासून तयार होणारे थंडगार पन्हं उष्णतेपासून संरक्षण करते. शरीर थंड ठेवते, हायड्रेशन वाढवते, उष्माघातापासून संरक्षण करते.
बेल फळाचे सरबत पचनासाठी उत्तम मानले जाते. बेलाच्या सरबतामुळे पचन सुधारते, गॅस-अपचन दूर होते याशिवाय थकवा कमी करते.
लिंबू सरबत म्हणजेच थेट फ्रेशनेसचा घोट. लिंबू सरबत हे व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत आहे, त्यामुळे शरीरात ऊर्जा मिळते.
थोडं झणझणीत आणि थंडगार जलजीरा उन्हाळ्याची खरी मजा देते. जलजिरा अपचनावर उपायोगी असून भूक वाढवते, शरीर थंड ठेवते.
मसाल्याचा तडका लावलेलं ताक उन्हाळ्याच्या दुपारी एकदम मस्त आहे. ताक पचनास मदत करते शरीर थंड ठेवून इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राखते.
उन्हाळ्यातील फळांपासून बनवलेले सरबत म्हणजे थंडगार मेजवानी. हे फळांचे ज्यूस अँटीऑक्सिडंट्सने भरपूर, ऊर्जा वाढवणारे, पौष्टिक असते.
गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेले सरबत शरीराला थंडावा देऊन मन शांत करतं. त्यामुळे सुगंधी आणि ताजेतवाने वाटायला लागते.
Humani Control : उसातील हुमणीला असं करा कंट्रोल