Pulses For Weight Loss : वेट लॉससाठी वरदान! 'या' ५ प्रोटीनयुक्त डाळी शरीराची अतिरिक्त चरबी करतील कमी

Anuradha Vipat

सर्वोत्तम शाकाहारी पर्याय

वजन झपाट्याने कमी करण्यासाठी आणि पोटाची अतिरिक्त चरबी वितळवण्यासाठी डाळी हा एक सर्वोत्तम शाकाहारी पर्याय आहे.

Pulses For Weight Loss | Agrowon

मेटाबॉलिझम

डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते, ज्यामुळे मेटाबॉलिझम वेगवान होते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही.

Pulses For Weight Loss | agrowon

मूग डाळ

मूग डाळ ही पचनासाठी अत्यंत हलकी आणि वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते. यामध्ये कॅलरीज खूप कमी आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.

Pulses For Weight Loss | Agrowon

मसूर डाळ

लाल रंगाची मसूर डाळ वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. मसूर डाळीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण योग्य असते.

Pulses For Weight Loss | Agrowon

हरभरा डाळ

चणा डाळ ही चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते. याचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' खूप कमी असतो.

Pulses For Weight Loss | agrowon

उडीद डाळ

उडीद डाळीमध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. ही डाळ फायबरचा खजिना आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते.

Pulses For Weight Loss | Agrowon

हुलगा डाळ

दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागात हुलगा किंवा कुलथीची डाळ वजन कमी करण्यासाठी प्रामुख्याने वापरली जाते. ही डाळ शरीरातील अतिरिक्त फॅट्स आणि वॉटर रिटेंशन कमी करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Pulses For Weight Loss | agrowon

Horoscope 5 September 2026 : आज या राशीच्या लोकांना नशिबाची उत्तम साथ लाभेल

Horoscope 5 September 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...