Anuradha Vipat
यंदाच्या दिवाळीत तुम्हाला सर्वात वेगळे आणि आकर्षक दिसायचे असेल, तर फॅशन विश्वात पारंपारिक आणि आधुनिकतेचा एक सुंदर संगम पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावरील ट्रेड्स आणि डिझायनर्सच्या कलेक्शननुसार, यंदाचे सण गाजवण्यासाठी खास लुक्स समोर आले आहेत.
सिल्क साड्यांचा ट्रेंड कधीच जुना होत नाही, पण २०२६ मध्ये टिश्यू सिल्क आणि पेस्टल रंगांच्या कांजिवरम साड्यांना प्रचंड पसंती दिली जात आहे.
कम्फर्ट आणि स्टाईल एकत्र हवी असल्यास फुल-लेंथ अनारकली सूट हा उत्तम पर्याय आहे. यंदा फ्लोरल ऑर्गेन्झा आणि ब्लॉक प्रिंट्स खूप ट्रेंड करत आहेत.
तरुण मुलींमध्ये शरारा प्रकाराला मोठी पसंती मिळत आहे. यंदा शॉर्ट पेपलम कुर्त्यासोबत घेरदार शरारा आणि त्यावर बारीक एम्ब्रॉयडरी असलेले जॅकेट घालण्याचा नवा ट्रेंड आला आहे.
महाराष्ट्रात दिवाळी पाडव्याला नऊवारी साडी नेसण्याची वेगळीच क्रेझ असते. यंदा पारंपरिक काठपदराच्या साडीसोबत मस्तानी किंवा पेशवाई स्टाईल कासोटा नेसणे फॅशनमध्ये टॉपवर आहे.
फॅशनमध्ये साध्या कुर्त्याऐवजी सिल्क किंवा लिनन कुर्त्यावर हेवी एम्ब्रॉयडरी असलेले नेहरू जॅकेट घालण्याचा ट्रेंड यंदा जोरात आहे.