Malaria Symptoms : सावधान! 'या' ५ लक्षणांवरून ओळखा की तुम्हाला मलेरिया झाला आहे; दुर्लक्ष करू नका!

Anuradha Vipat

धोकादायक आजार

मलेरिया हा ॲनोफिलीस जातीच्या संक्रमित डासाच्या चावण्यामुळे होणारा एक गंभीर आणि धोकादायक आजार आहे.

Malaria Symptoms | agrowon

अत्यंत महत्त्वाचे

वेळेवर उपचार न मिळाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे त्याची लक्षणे वेळीच ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Malaria Symptoms | agrowon

थंडी वाजून तीव्र ताप येणे

हे मलेरियाचे सर्वात प्रमुख लक्षण आहे. रुग्णाला अचानक खूप थंडी वाजते, शरीर थरथर कापते आणि त्यानंतर १०२ ते १०४ अंश किंवा त्याहून अधिक तीव्र ताप येतो.

Malaria Symptoms | agrowon

अतिप्रमाणात घाम

ताप येणे, घाम येऊन तो उतरणे आणि काही तासांनी पुन्हा ताप येणे, असे चक्र मलेरियामध्ये वारंवार घडते.

Malaria Symptoms | Agrowon

तीव्र डोकेदुखी आणि अंगदुखी

तापासोबतच रुग्णाचे डोके प्रचंड दुखते. तसेच पाठीचे, हाता-पायांचे स्नायू आणि सांधे यामध्ये तीव्र वेदना होतात, ज्यामुळे शरीरात कमालीचा अशक्तपणा येतो.

Malaria Symptoms | Agrowon

मळमळ, उलट्या आणि पोटदुखी

मलेरियाच्या संसर्गामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. रुग्णाला सतत मळमळल्यासारखे होते, उलट्या होतात आणि काही वेळा पोटात तीव्र कळा येतात.

Malaria Symptoms | agrowon

अशक्तपणा आणि त्वचा पिवळी पडणे

मलेरियाचे जंतू शरीरातील तांबड्या रक्तपेशींवर हल्ला करून त्या नष्ट करतात. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होऊन तीव्र अशक्तपणा येतो.

Malaria Symptoms | agrowon

Eco-Friendly Rakhi At Home : यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी स्वतःच्या हाताने बनवा 'इको-फ्रेंडली राखी'; जाणून घ्या सोपे उपाय

Eco-Friendly Rakhi At Home | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...