Anuradha Vipat
भृंगराज तेल केसांच्या सर्व समस्यांवर एक उत्तम आयुर्वेदिक रामबाण उपाय मानले जाते.
आयुर्वेदामध्ये भृंगराजला 'केशराज' म्हणजेच 'केसांचा राजा' म्हटले गेले आहे.
भृंगराज तेल केसांच्या मुळांना मजबूत करते. या तेलाने टाळूला मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केस गळणे वेगाने कमी होते.
हे केसांच्या फॉलिकल्सना सक्रिय करते, ज्यामुळे नवीन केस उगवण्यास आणि केसांची लांबी वाढण्यास मदत होते.
भृंगराज तेलामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे तेल टाळूवरील कोंडा, कोरडेपणा आणि इन्फेक्शन पूर्णपणे साफ करते.
भृंगराजमध्ये आढळणारे नैसर्गिक घटक केसांचा मूळ काळा रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामुळे वयाआधीच केस पांढरे होण्याची समस्या थांबते.
भृंगराज तेल कूलिंग एजंट म्हणून काम करते. या तेलाच्या मसाजमुळे डोक्याला थंडावा मिळतो, मानसिक तणाव कमी होतो.