Anuradha Vipat
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायामासोबतच काही नैसर्गिक औषधी वनस्पती अत्यंत प्रभावी ठरतात.
या वनस्पती शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यास आणि इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करतात.
या वनस्पतीच्या पानांमध्ये अशी नैसर्गिक संयुगे असतात जी स्वादुपिंडाला उत्तेजित करतात. हे शरीरात नैसर्गिक इन्सुलिनची निर्मिती वाढवते.
गुळवेल ही आयुर्वेदातील एक शक्तिशाली वनस्पती आहे, जी हायपरग्लायसेमिया कमी करते. ही वनस्पती शरीरातील ग्लुकोज शोषून घेण्याची क्षमता सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
कडुलिंबाच्या पानात हायपोग्लायसेमिक गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. हे रक्ताभिसरण सुधारते आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवून रक्तातील साखर वेगाने कमी करण्यास मदत करते.
सदाफुलीच्या फुलांमध्ये आणि पानात 'अल्कलीड्स' असतात, जे मधुमेहावर गुणकारी मानले जातात. हे शरीरातील स्वादुपिंडाच्या बीटा पेशींना सक्रिय करते.
जांभळाच्या बियांमध्ये 'जांबोलिन' नावाचे ग्लुकोसाइड असते, जे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखते.