Buffalo Breed : दूध उत्पादनासाठी टॉप ३ म्हशींच्या जाती

Mahesh Gaikwad

दुग्ध व्यवसाय

शेतीला पूरक धंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांत पशुपालनाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे.

Dairy Business | Agrowon

दूध उत्पादन

दुग्ध व्यवसायात दूध उत्पादनात सातत्य राहणे महत्त्वाचे असते. यासाठी जास्त उत्पादन देणाऱ्या गायी-म्हशी पाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो.

Cow Milking | Agrowon

संकरित गायी

जास्त दूध उत्पादनासाठी अनेक शेतकरी संकरित गायी पाळतात. मात्र, गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला जास्त मागणी असते.

Milk Production | Agrowon

जनावरांचे आहार व्यवस्थापन

योग्य व्यवस्थापन आणि आहारामुळे दूध उत्पादनात सातत्य राखता येते. आज आपण अशाच जास्त दूध देणाऱ्या टॉप ३ म्हशींच्या जाती पाहणार आहोत.

Buffalo Breed | Agrowon

मुऱ्हा म्हैस

अनेक पशुपालकांच्या गोठ्यात मुऱ्हा जातीच्या म्हशींची संख्या तुलनेने जास्त दिसते. ही म्हैस एका वेतात १८०० ते २००० लिटरपर्यंत दूध देते.

Buffalo Breed | Agrowon

मेहसाणा म्हैस

मुऱ्हानंतर मेहसाना ही म्हशीची जात जास्त दूध देण्यासाठी प्रसिध्द आहे. शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी ही म्हैस पाळू शकतात.

Buffalo Breed | Agrowon

पंढरपुरी म्हैस

पंढरपुरी म्हैस ही देखील जास्त दूध उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. ही म्हैस एक वेतात साधरणपणे १५०० ते १८०० लिटरपर्यंत दूध देते.

Buffalo Breed | Agrowon