Anuradha Vipat
जर तुम्हाला अचानक दातदुखी सुरू झाली असेल तर खालीलपैकी काही प्रभावी घरगुती उपाय तुम्हाला तात्पुरता आराम देऊ शकतात.
दातांच्या दुखण्यावर लवंग हा सर्वात गुणकारी उपाय आहे. दुखणाऱ्या दाताखाली लवंग दाबून धरा.
एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा आणि त्याने गुळण्या करा. ज्यामुळे दातातील जंतू मरतात आणि सूज कमी होण्यास मदत होते.
लसणाची एक पाकळी ठेचून त्यात थोडे मीठ मिसळा आणि ती पेस्ट दुखणाऱ्या दातावर लावा
एका कापडात बर्फाचे खडे गुंडाळून गालाच्या बाहेरून १०-१५ मिनिटे शेक द्या.
हळदीत मीठ आणि मोहरीचे तेल मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट दुखणाऱ्या दातावर आणि हिरड्यांवर लावल्याने जंतुसंसर्ग कमी होतो
पेरूच्या पानांमध्ये सूज कमी करणारे गुणधर्म असतात. पेरूची ताजी पाने धुवून ती चावा.