Anuradha Vipat
गुगलवर काही गोष्टी सर्च करणे तुमच्या गोपनीयतेसाठी, सुरक्षिततेसाठी आणि कायदेशीर दृष्टिकोनातून धोक्याचे ठरू शकते.
बॉम्ब, अमली पदार्थांची विक्री किंवा खरेदी कशी करायची किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे प्रश्न सर्च करू नका.
आजारी असल्यावर स्वतःची लक्षणे गुगलवर शोधणे टाळा.ज्यामुळे विनाकारण भीती निर्माण होते.
कोणत्याही बँकेची वेबसाईट किंवा कस्टमर केअर नंबर थेट गुगलवर शोधून त्यावर विश्वास ठेवू नका.
लहान मुलांशी संबंधित अश्लील साहित्य हे शोधणे हा जगभरात अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे.
स्वतःचे पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर किंवा ईमेल आयडी गुगलवर वारंवार सर्च करू नका.
गर्भपात करणे किंवा त्याबाबतची औषधे शोधणे कायदेशीर गुंतागुंतीचे आणि आरोग्यासाठी जीवघेणे ठरू शकते