Mahesh Gaikwad
बऱ्याचदा काही थंड किंवा गरम खाल्ल्यामुळे दातांना जोरदार कळ लागते. यामुळे दातांना प्रचंड वेदना होतात.
जर तुमच्याही दातांना अशी कळ लागत असेल, तर ही समस्या करण्यासाठी तुमची ब्रश करण्याच्या पध्दतीमध्ये बदल करा.
दातांच्या स्वच्छतेसाठी मऊ केसांच्या ब्रशने हळूहळू दातांची स्वच्छता करा. यामुळे ब्रश करताना दातांना त्रास होणार नाही.
दातांची कळ कमी करण्यासाठी नियमितपणे तोंडाची स्वच्छता करा आणि गरम पाण्याने गुळण्या करा.
दातांच्या कळांमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी लवंगाचे तेल लावू शकता.
कापसाच्या बोळ्यावर लवंगाचे तेल घेवून ते दातांवर लावा, ज्यामुळे लवकर आराम मिळेल.
मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे दातांच्या कळांमुळे होणारी वेदना कमी होते.
जर घरगुती उपाय करूनही वेदना कमी होत नसतील, तर तातडीने दाताच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.