Mahesh Gaikwad
लसूणमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे दररोज सकाळी उपाशीपोटी लसूण खाल्ल्यास शरीराला विविध प्रकारे फायदे होतात.
लसूण आरोग्यासाठी गुणकारी असला, तरी बऱ्याचदा आपल्याला लसूण कशाप्रकारे खायचा याची माहिती नसते.
सकाळी उपाशीपोटी लसणाच्या एक ते दोन कच्च्या पाकळ्या थेट चावून खाऊ शकता किंवा बारीक करून खाऊ शकता.
लसूण शरीरातील कोलस्टेरॉल कमी करतो, ज्यामुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारते. तसेच रक्तदाबही नियंत्रणात राहण्यास मदत होते.
लसणामधील अँटीबायोटिक आणि अँटीफंगल गुणधर्मांमुळे शरीराचा विविध संसर्गांपासून बचाव होतो. दररोज सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती बळकट होते.
लसूण खाल्ल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. परिणामी यकृतआणि किडनीचे कार्य सुधारते.
लसणामधील औषधी घटकांमुळे तुमचे मेटाबॉलिझम वाढते. त्यामुळे शरीरातील चरबी वेगाळे जळते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
ज्यांना अॅसिडिटी किंवा पोटात जळजळ होण्याची समस्या असते, अशांनी उपाशीपोटी लसूण घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.