Health Tips : अति चहा आरोग्यासाठी हानिकारकच! एका दिवसात किती कप चहा प्यावा?

Mahesh Gaikwad

चहा शौकीन

भारतातल्या प्रत्येक घरात चहा हे नित्य नियमाने पिला जातो. काही लोक तर चहाचे अक्षरश: शौकीनच असतात.

Health Tips | Agrowon

अति चहा

चहाचे शौकिन असणारे दिवसभरात कितीही चहा पितात. पण हे अति चहा पिणे अशा लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Health Tips | Agrowon

आरोग्यासाठी हानिकारक

त्यामुळे सामान्य व्यक्तीने एका दिवसात किती चहा प्यायला पाहिजे आणि जास्त चहा प्यायल्याने त्याचा काय परिणाम होतो, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Health Tips | Agrowon

किती चहा प्यावा

आहार तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एका दिवसात २-३ कपपेक्षा अधिक चहा किंवा कॉफी पिऊ नये.

Health Tips | Agrowon

डिहायड्रेशन

जास्त प्रमाणात चहा प्यायल्यामुळे शरीरामध्ये डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.

Health Tips | Agrowon

पोटाची समस्या

२-३ कपांपेक्षा जास्त चहा प्यायल्यामुळे पोटामध्ये गॅस, जळजळ आणि अपचनाच्या समस्या होवू शकते.

Health Tips | Agrowon

पाणीही प्या

तुम्ही दिवसभरात जेवढे कप चहा प्याल त्याशिवाय किमान तेवढे ग्लास पाणी तुम्ही प्यायलेच पाहिजे.

Health Tips | Agrowon

आरोग्याच्या समस्या

जर तुम्ही दिवसभरात २ कप चहा पित असाल, तर दोन ग्लास अधिकचे पाणी तुम्ही प्यायलेच पाहिजे. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.

Health Tips | Agrowon