Roshan Talape
टोमॅटोमधील सोलानाईन नावाचे रसायन सांधेदुखी आणि जळजळ वाढवतात, त्यामुळे टोमॅटोचे सेवन संधिवात असलेल्या लोकांनी कमी प्रमाणात करावे.
टोमॅटोमधील टॅनिक ऍसिड लोह शोषण कमी करू शकते, ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. त्यामुळे लोहअल्पता असलेल्या लोकांनी टोमॅटोचे सेवन कमी प्रमाणात करणे फायदेशीर ठरते.
संवेदनशील पचनसंस्था असलेल्या लोकांसाठी टोमॅटोमधील फायबर आणि आम्लयुक्त घटक अपचन, पोटदुखी आणि गॅसचा त्रास वाढवू शकतात.
टोमॅटोमधील हिस्टामाइनमुळे काही लोकांना त्वचेवर पुरळ, खाज आणि ऍलर्जी होऊ शकते.
जास्त टोमॅटो खाल्ल्यास काही लोकांना अतिसार किंवा वारंवार शौचास जावे लागण्याचा त्रास होऊ शकतो.
जास्त टोमॅटो खाल्ल्यास ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
टोमॅटोमध्ये ऑक्सलेट असते, जे जास्त प्रमाणात घेतल्यास मूत्राशयात खडे होण्याचा धोका वाढतो.
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात सोडियम असल्याने जास्त सेवन केल्यास रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो.