Roshan Talape
नेहा पालेकरने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नारळ झाडावर चढण्याचे प्रशिक्षण घेतले आणि चार वर्षांत 5000+ झाडांवरील नारळ काढले. आज ती 'कोकोनट गर्ल' म्हणून प्रसिद्ध असून, 25+ लोकांना नारळ बाग व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देत आहे.
नोकरीनिमित्त पती बाहेर असताना त्या महिलाने संपूर्ण शेतीची जबाबदारी स्वतः घेतली. पाण्याचे योग्य व्यवस्थापन, फळबागांचे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तिने प्रगतिशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली.
घर आणि शेती गमावूनही फक्त 12 गुंठ्यांत भाजीपाला उत्पादन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मेहनत, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर तिने आर्थिक स्थैर्य मिळवले.
एकाकीपणा आणि संकटांवर मात करत तिने निर्यातक्षम डाळिंब शेतीत यश मिळवले. जिद्द, कष्ट आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर तिचा संघर्ष प्रेरणादायी ठरला.
एका गाईपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय 33 गाईंपर्यंत वाढवला. गोसंगोपनाची आवड आणि व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर, पतीच्या साथीने तिने आर्थिक स्थैर्य प्राप्त केले.
ऊस रस प्रक्रिया उद्योग सुरू करून तिने ‘गन्ना चुस्की’, ऊस रस चहा, चटणी यासारखी नवीन उत्पादने विकसित केली. छोट्या भांडवलातून मोठे यश मिळवत तिने कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिले.
कोकणातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी साक्षी माने गेल्या दोन वर्षांपासून साडवली (रत्नागिरी) येथील रोपवाटिकेचे नियोजन सांभाळत आहे. रोपांची काळजी, संवर्धन आणि शेतकरी तसेच महिला गटांना प्रशिक्षण देणे हे तिचे महत्त्वपूर्ण कार्य आहे.
नावीन्यपूर्ण संशोधन करून रिद्धीने द्राक्षांवर प्रक्रिया करून नवे उत्पादन तयार केले. तिच्या संशोधनामुळे अन्न प्रक्रिया उद्योगात नवे दार उघडले असून, उद्योगात एक नवीन दिशा दाखवली आहे.