Swarali Pawar
पावसाची उघडीप आणि कोरड्या वातावरणामुळे टोमॅटोवर रसशोषक किडी वाढत आहेत. मावा, पांढरी माशी आणि फुलकिडींचे वेळीच नियंत्रण करा.
फुलकिडे पान खरवडून त्यातील रस शोषतात. पाने आधी पांढरी आणि नंतर तपकिरी पडून आकसतात.
पांढरी माशी रस शोषल्याने पाने पिवळी पडतात आणि काळी बुरशी वाढू शकते. या किडीमुळे टोमॅटोमध्ये लिफ कर्ल रोगाचा प्रसारही होतो.
मावा पानांच्या खालच्या बाजूला पुंजक्याने आढळतो आणि रस शोषतो. त्यामुळे पाने पिवळी पडून निस्तेज होतात आणि कडा वळतात.
टोमॅटोमध्ये रसशोषक किडी दिसताच एकरी २० ते २५ पिवळे चिकट सापळे लावा. यामुळे किडींची संख्या कमी करण्यास मदत होते.
लागवडीनंतर ३० दिवसांनी किडी दिसल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करा. प्रादुर्भाव वाढल्यास शिफारशीनुसार कीटकनाशकाचा वापर करा.
सायअॅन्ट्रानिलिप्रोल १०.२६ ओडी १८ मिलि किंवा फ्लोनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी वापरता येते. एकावेळी यापैकी कोणतेही एकच कीटकनाशक वापरा.
टोमॅटोपूर्वी तूर, कपाशी, हरभरा, वांगी किंवा मिरची असल्यास त्याच शेतात लागवड टाळा. फेरपालट, खोल नांगरट आणि रोपवाटिकेचे संरक्षण केल्यास किडींचा धोका कमी करता येतो.