Swarali Pawar
पावसाच्या खंडात हिरवा चारा कमी होतो आणि जनावरांवर ताण येतो. आहार, पाणी आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेला चारा, कडबा आणि झाडांचा चारा द्या. गरजेनुसार खनिज मिश्रण आणि पूरक आहार द्या.
जनावरांना नेहमी स्वच्छ पाणी उपलब्ध ठेवा. पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करा आणि दूषित पाणी टाळा.
कमी पावसातही अंतर्गत जंतांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने योग्य औषध आणि मात्रा ठरवा.
कान, मान, काख, कास आणि शेपटीजवळ नियमित तपासणी करा. प्रादुर्भाव दिसल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्याने मान्यताप्राप्त औषध वापरा.
गोठ्यात शेण, कचरा आणि ओलावा साचू देऊ नका. हवेशीर गोठा ठेवा आणि जनावरांची गर्दी टाळा.
पावसाचा खंड असला तरी नियमित लसीकरण सुरू ठेवा. करडे आणि कोकरांकडे विशेष लक्ष द्या.
शेळ्या-मेंढ्यांना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी चरायला सोडा. एकाच ठिकाणी रोज चराई न करता वय आणि अवस्थेनुसार आहाराचे नियोजन करा.