Anuradha Vipat
टोमॅटो फेस पॅक हा उन्हाळ्यातील टॅनिंग आणि चेहऱ्यावरील जिद्दी काळे डाग दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी घरगुती उपाय आहे.
टोमॅटोमध्ये 'लायकोपिन' नावाचे अँटी-ऑक्सिडंट आणि नॅचरल ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवतात.
२ चमचे टोमॅटोचा रस, १ चमचा फ्रेश दही. दोन्ही एकत्र करून चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.
२ चमचे टोमॅटोचा पल्प (गर), १ चमचा शुद्ध मध हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
१ चमचा टोमॅटोचा रस, १ चमचा बेसन, चिमूटभर हळद पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर हलक्या हाताने चोळून कोमट पाण्याने धुवा.
टोमॅटोमध्ये नैसर्गिक आम्ल असते. त्यामुळे संवेदनशील त्वचा असलेल्यांनी हा पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हातावर लावून टेस्ट करावी.
उत्तम रिझल्टसाठी हा फेस पॅक आठवड्यातून २ ते ३ वेळा संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी लावावा.