Anuradha Vipat
रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी शारदीय नवरात्रीची आठवी माळ आहे आणि आजचा पावन रंग जांभळा आहे .
हा रंग भव्यता, समृद्धी आणि आध्यात्मिक शांततेचे प्रतीक मानला जातो
जर तुम्हाला आज पारंपारिक लूक करायचा असेल, तर जांभळ्या रंगाची पैठणी, बनारसी किंवा कांजिवरम सिल्क साडी नेसा .
दांडिया किंवा गरबा नाईटसाठी डार्क व्हायोलेट किंवा लॅव्हेंडर शेडचा लेहंगा परफेक्ट ठरेल .
जर साडी किंवा लेहंगा सांभाळणे कठीण वाटत असेल, तर जांभळ्या रंगाचा जॉर्गेट किंवा सिल्क अनारकली सूट निवडा .
आजकाल सणांमध्ये मॉडर्न टच आवडणाऱ्या महिलांसाठी एथनिक को-ऑर्ड सेट्स किंवा लाँग केप श्रग विथ पलाझो हा एक उत्तम पर्याय आहे .
ऑफिस किंवा घरगुती पूजेसाठी एकदम हलकाफुलका लूक हवा असल्यास, जांभळ्या रंगाची चिकनकारी कुर्ती पांढऱ्या पलाझो किंवा स्ट्रेट पॅंटसोबत पेअर करा.