Dussehra Special Thali : विजयादशमी स्पेशल नैवेद्य थाळी: 'या' सोप्या पद्धतीने बनवा दसऱ्याचा पारंपारिक बेत!

Anuradha Vipat

विजयादशमी

विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घरात सुख, समृद्धी आणि आनंदाचे वातावरण असते.

Dussehra Special Thali | agrowon

नैवेद्य थाळी

या विशेष दिवशी देवीला आणि देवाला दाखवण्यासाठी मराठमोळी, पारंपरिक आणि चवदार नैवेद्य थाळी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची, याचा बेत आणि कृती खालीलप्रमाणे आहे:

Dussehra Special Thali | agrowon

नैवेद्य थाळीचा बेत

गुबगुबीत पुरणपोळी,कटाची आमटी ,मऊ मऊ सुगंधी भात / जीरा राईस, कुरकुरीत भजी,बटाट्याची सुकी भाजी किंवा रस्सा भाजी,चटणी, लिंबू, आणि तांदळाचे किंवा गव्हाचे पापड.

Dussehra Special Thali | agrowon

पुरणपोळीची सोपी पद्धत

चणा डाळ धुवून कुकरमध्ये ३-४ शिट्ट्या काढून मऊ शिजवून घ्या. डाळीचे पाणी (कटाचे पाणी) वेगळे काढून ठेवा. शिजलेल्या डाळीत गूळ आणि वेलची-जायफळ पूड घालून मिक्स करा. हे मिश्रण कढईत घट्ट होईपर्यंत परतून घ्या .

Dussehra Special Thali | agrowon

पोळी लाटणे

गव्हाच्या पिठाची मऊ कणिक मळून घ्या. कणकेच्या उंड्यात पुरण भरून हलक्या हाताने पोळी लाटा आणि तव्यावर तूप लावून दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या.

Dussehra Special Thali | agrowon

चमचमीत कटाची आमटी

कुकरमधून काढलेल्या डाळीच्या पाण्यात थोडं शिजलेलं पुरण मिक्स करा. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग आणि हळद घालून फोडणी द्या. त्यात वाटलेला सुका नारळ, आले-लसूण पेस्ट आणि कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला परतून घ्या आमटीला छान उकळी येऊ द्या.

Dussehra Special Thali | agrowon

नैवेद्याचे इतर झटपट पदार्थ

उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून जिरे, मोहरी, हिरवी मिरची आणि हळद घालून झटपट सुकी भाजी बनवा. जेवण वाढताना शेवटी गरम-गरम बटाट्याची भजी आणि पापड तळून घ्या.

Dussehra Special Thali | agrowon

Magic Of Acupressure : शरीराचे 'हे' भाग दाबा आणि औषधांशिवाय पळवून लावा गंभीर आजार!

Magic Of Acupressure | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...