Anuradha Vipat
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. उत्साह वाढेल आणि आरोग्य उत्तम राहील.
दीर्घकालीन रेंगाळलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. वाहने सावधगिरीने चालवा.
मित्रमैत्रिणींचा चांगला सहवास व सहकार्य लाभेल. बौद्धिक क्षमता दाखवण्याची संधी मिळेल.
कार्यक्षेत्रात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.आर्थिक बाजू भक्कम होईल. एखाद्या हितचिंतकाचा सल्ला आज महत्त्वाचा ठरेल.
एखादी आनंदवार्ता किंवा महत्त्वाची बातमी समजेल. सहकाऱ्यांकडून मात्र फार अपेक्षा ठेवू नका.
व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे फायदेशीर ठरेल. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
वैवाहिक जीवनात नातेवाईकांशी सुसंवाद राहील. भागीदारीच्या व्यवसायात उत्तम यश लाभेल.
आज रोजच्या दिनचर्येत आणि जीवनात काही चांगले बदल घडतील. मनोरंजनाकडे कल राहील.
तुम्ही तुमची मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. मुले किंवा कुटुंबातील सदस्यांचे प्रश्न मार्गी लागतील.
राहत्या जागेचे किंवा प्रॉपर्टीचे प्रश्न मार्गी लागतील. जमा आणि खर्चाचा योग्य ताळमेळ बसेल.
नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे उत्तम वातावरण राहील. नातेवाईक आणि भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल.
जुनी रखडलेली येणी किंवा पैशांची वसुली होईल. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा.