Nervous System Health : मज्जासंस्था कमजोर झाली आहे? नसा मजबूत करणारे सोपे उपाय आणि व्यायाम!

Anuradha Vipat

शरीराचे कामकाज

मज्जासंस्था ही आपल्या शरीराची नियंत्रण प्रणाली आहे, जी मेंदू, पाठीचा कणा आणि नसा यांच्याद्वारे संपूर्ण शरीराचे कामकाज चालवते.

Nervous System Health | Agrowon

समस्या

मज्जासंस्था कमकुवत झाल्यास हात-पायांना मुंग्या येणे, विसरभोळेपणा, शरीराचा समतोल बिघडणे, स्नायू कमकुवत होणे आणि सततचा मानसिक ताण यांसारख्या समस्या उद्भवतात.

Nervous System Health | Agrowon

व्यायाम

नियमित शारीरिक हालचालींमुळे मेंदूला आणि नसांना होणारा रक्तपुरवठा सुधारतो, ज्यामुळे मज्जासंस्था सक्रिय राहते.

Nervous System Health | agrowon

प्राणायाम आणि अनुलोम-विलोम

मज्जासंस्थेसाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे. रोज १० ते १५ मिनिटे अनुलोम-विलोम प्राणायाम केल्याने मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि मज्जासंस्था शांत व मजबूत होते.

Nervous System Health | Agrowon

आहार

व्हिटॅमिन बी-१२ नसांच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी दूध, दही, पनीर, अंडी किंवा मशरूम यांचा आहारात समावेश करा.

Nervous System Health | Agrowon

अश्वगंधा

हे नसांचा थकवा दूर करते आणि मानसिक ताण कमी करून मज्जासंस्था मजबूत करते. दररोज रात्री १ चमचा अश्वगंधा पावडर कोमट दुधासोबत घ्या.

Nervous System Health | agrowon

मसाज थेरपी

दररोज किंवा आठवड्यातून दोनदा कोमट तिळाच्या तेलाने किंवा बदाम तेलाने संपूर्ण शरीराला अथवा पाठीच्या कण्याला हलका मसाज करा. तेल मालिश केल्याने नसांना त्वरित उत्तेजना मिळते आणि मज्जासंस्था बळकट होते.

Nervous System Health | Agrowon

Chest Congestion : खोकला आणि छातीतील जडपणावर रामबाण उपाय: कफ बाहेर काढण्याचे नैसर्गिक मार्ग

Chest Congestion | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...