Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रानुसार, जांभळा रंग हा भव्यता, अध्यात्मिक शांतता, ज्ञान, समृद्धी आणि आदराचे प्रतीक मानला जातो.
नवरात्रीची आठवी माळ ही देवी महागौरीला समर्पित असते.
हा रंग मनाला शांतता प्रदान करतो आणि भक्तांमध्ये सकारात्मक ऊर्जा तसेच आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो.
आज गरबा नाईट्स, ऑफिस किंवा घटस्थापनेच्या पूजेसाठी जांभळ्या रंगाचे पारंपारिक कपडे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाईल.
जांभळा रंग हा लाल रंगाची ऊर्जा आणि निळ्या रंगाची शांतता या दोघांच्या मिश्रणातून बनतो. त्यामुळे हा रंग माणसाचा आत्मविश्वास वाढवतो.
हा रंग कल्पकता आणि नवीन विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी ओळखला जातो.
आजच्या दिवशी तुम्ही जांभळ्या रंगाची पैठणी, कांजिवरम साडी, किंवा सिल्क कुर्ता परिधान करू शकता.